बुकमार्क : गांधी आजही अपरिहार्यच! - Marathi News | Book Review Thank You Gandhi By Author Krishna Kumar Zws 70 - Latest Columns News at Loksatta.com https://www.loksatta.com/sampadkiya/columns/book-review-thank-you-gandhi-by-author-krishna-kumar-zws-70-5402709/
समाज माध्यमावर दररोज येणारी माहिती आपण कधी तपासून पाहिली आहे का? आपण नीट विचार करून शेवटचे कधी बोललो? एखाद्या परधर्मीयाबद्दल आपण शेवटच्या सहिष्णु विचार कधी केलाय? अनोळखी माणसांच्या किंवा समूहांच्या दुःख वेदनांबद्दल मला शेवटची अनुकंपा कधी दाटून आलीय? दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल शेवटचा गंभीर विचार कधी केलाय? शासनाच्या स्पर्धा परीक्षेत नापास होणारी मुले काय करतात? मोठ्या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या जनसमुहांच पुढे काय होतं? याची माहिती काढायचा मी कधी प्रयत्न केलाय का? मी मतदान करणारा मतदार आहे की नागरिक? मतदार आणि नागरिक मध्ये काही फरक आहे का?
आजच्या काळात या प्रश्नांची उत्तरे, मी कशाला शोधू? माझा काय संबंध? असं मनात उमटण्याची शक्यता असणाऱ्यांची संख्या प्रचंड बहुमतात आहे. आजचा काळ प्रश्न विचारण्याचा नाही. प्रश्न निर्माण झाले की विचार करावा लागतो. डोक्याला त्रास घ्यावा लागतो. त्यातून माझ्यामध्ये बंधुभाव, प्रेम ,आपुलकी ,सहिष्णुता इत्यादी गुणांची मात्रा वाढू लागते. त्यापेक्षा जळजळीत अस्मितांच्या जहरी लाटांमध्ये मी सुखाने डुंबत राहतो. माझी मोक्ष प्राप्ती मला अस्मितेतून प्राप्त होणार असते. समूह अस्मितेत मला सुरक्षित वाटतं. आपल्यापैकी बहुतेकांना असं सुरक्षित वाटत असणं ही आजची वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
आजचा भारत देश आणि स्वातंत्र्य मिळालेला भारत देश यात फार फरक आहे याची स्पष्ट जाणीव होणाऱ्या अनेकांपैकी शिक्षणतज्ञ कृष्णकुमार आहेत. या जाणिवेचा शोध घेणारे त्यांचे पुस्तक आहे ' थँक यू गांधी '. हे पुस्तक म्हणजे कादंबरी आहे की वैचारिक लेखन की त्यांचे फ्युजन अशी चर्चा न करता कृष्ण कुमारांना का आणि काय म्हणायचे आहे ते महत्त्वाचं.
नुकतच स्वातंत्र्य मिळालं आहे. मध्य प्रदेशातील एका गावात दोन मित्र आहेत. वय बालवाडीचे. पहिला आहे वीरेश प्रताप सिंग राजघराण्यातला. दुसरा आहे कन्हैया स्थानिक वकिलांचा मुलगा. वीरेशला सगळे मुन्ना म्हणतात. गांधीजींच्या नई तालीम संकल्पनेवर आधारित प्राथमिक शाळेमध्ये दोघेही शिकत आहेत. त्यानंतर गोष्ट वेगाने सरकत जाते. मुन्ना आयएएस होतो. लग्न होतं. मध्यप्रदेश केडर मध्ये काम सुरू करतो. नंतर दिल्ली. सेवानिवृत्तीनंतर दिल्लीमध्येच राहतो. कन्हैया दिल्लीत प्राध्यापक आहे. थोडेफार लिखाण करतो. दोघांचे मैत्री कायम आहे. मुन्नाला कोरोनाची बाधा होते. तो सिरीयस होतो. मरण्यापूर्वी तो कन्हैयाला एक ईमेल पाठवतो. मी जगलो नाही तर माझं अर्धवट लिखाण तू पूर्ण कर. ही सगळी गोष्ट पहिल्या सत्तावीस पानात लेखकाने आटोपली आहे. या कहाणीत वाचकाने गुंतून जावं अशी लेखकाची इच्छा नाही.
मुन्ना च्या मृत्युने सुन्न झालेला कन्हैया त्याचा मेल परत परत वाचतो. त्या मेल ला दहा फाईल जोडलेले आहेत. त्यातला एक-दोन हिंदीत बाकीच्या इंग्रजीत आहेत. फाईलची नावे जी वरून सुरू होतात. म्हणजे कदाचित गव्हर्मेंट असणार. सिव्हिल सर्व्हिस मधून निवृत्त झालेले अधिकारी चरित्र लिहितात तसंच असणार बहुतेक. त्यामुळे हे काम करावं की नाही याबद्दल कन्हैया साशंक आहे. तरीही आपल्या जवळच्या मित्राची मरणोत्तर जबाबदारी आपल्यावर असल्याने कन्हैया वाचत जातो. वाचताना कन्हैयाची बदलती प्रतिक्रिया लेखकाने मांडलेली आहे. सुरुवातीचे संथ जीवन लिहून आसपासची बदलती परिस्थिती टिपल्यावर मुन्ना लिहितो शासनसंस्थेतील नवीन संस्कृतीने भारत ताब्यात घेतला आहे. राजकीयदृष्ट्या शापित असलेल्या देशावर मुन्नाचे भाष्य आहे हे समजल्यावर याची जाणीव त्याला होते आणि कन्हैया सावध होतो. या विस्कळीत लिखाणात स्फोटके दडल्याची जाणीव झाल्यावर तो ठरवतो की फार काही तडजोडी न करता हे लिखाण आपल्याला वाचनीय करायचे आहे. शेवटच्या दहाव्या छोट्या फाईलचे शीर्षक असते थँक यू गांधी. मग एकंदर सगळ्या लिखाणाचा अर्थ लागत कन्हैयाला असं वाटतं ' माझ्यातली भीती आणि बौद्धिक पळपुटेपणा मी काढून टाकावा असंच मित्र मला सांगतोय. प्रकाशकाला हवा तसा सुधारित मजकूर देऊन त्याला समाधानी करणारा संपादक मी व्हावं का? मग माझ्या लेखक असण्याला अर्थ काय? सत्य कथनाचे परिणाम काय होतील हे सांगायला मुन्ना जिवंत नाही. मात्र या अडचणीतून सुटकेचे प्रतीक गांधी आहेत. माझ्या मनात गांधींना ठेवण्याचा मी निर्णय घेतलाय. गांधीजींच्या सत्य ,अहिंसा आणि इतर मार्गांचा आपल्या परीने अर्थ लावण्याचे काम मुन्नाने सुरु केले आहे. त्यातील बिंदू जोडून अपूर्णतेला पूर्णतेकडे नेताना माझी हरवलेली वैचारिक सुरक्षितता मला परत मिळालेली आहे.'
या पुढील सर्व म्हणजे जवळजवळ दोन तृतीयांश मजकूर मुन्नाचे लिखाण आहे. लहानपणापासूनचे जीवन. त्यातले संस्कार. मग आयएएसची करिअर. मध्यप्रदेशात काम करणे. भारत भवनची पायाभरणी. इंदिरा गांधींची हत्या. त्याच्या प्रतिक्रियेतील दंगली. युनियन कार्बाइडची गॅस गळती. बदलत जाणारा भोपाळ. राजीव गांधींच्या कारकिर्दीतील दोन महत्त्वाचे निर्णय. मंडल कमिशन लागू करणे. बाबरी मशीद प्रकरण. ते अगदी कोरोनाच्या आधीचे शाहीन बाग आंदोलन. या सर्व प्रश्नांची चर्चा करत बदलत्या भारताचे चित्र स्पष्ट करत नेण्याचा प्रयत्न केला आहे. मध्येच मुन्ना गांधीजींची चर्चा करतो. गांधींवरील अनेकांच्या लिखाणांची सुद्धा चर्चा करतो. गांधींची सत्याची कल्पना कुठून आली असेल ,त्यांनी श्रद्धेला कसे विचारात घेतले असेल याची चर्चा करत असताना विविध धर्म विचारातील संकल्पनांच्या घुसळणीतून गांधी विचार कसा घडत गेला याची मांडणी करताना तो एक महत्त्वाचे विधान मांडतो 'मूल्यांचे आचरण व्यक्तिगत असू शकत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र केल्याशिवाय माझ्या स्वातंत्र्य मूल्याला काहीच अर्थ राहत नाही.'
गांधीजींचे रामाचे प्रेम सर्वश्रुत होते. त्यांचे शेवटचे शब्दही हे राम आहेत. मात्र जनतेला आंदोलनात खेचण्याच्या गांधींच्या क्षमतेची तुलना गुरुदेव टागोरांनी श्रीकृष्णाशी केली आहे. हाच मुद्दा पुढे नेत, गांधी आणि कृष्णाचा शेवट आणि चरखा आणि बासरी ही तुलना वाचनीय आहे. गांधीजींचे सत्य, सायन्स ,धर्म ,जातीप्रथा याबद्दलचे विचार पुन्हा एकदा तपासून नव्या परिप्रेक्षात अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. मुन्नाच्या पुस्तकाचे मूळ कारण आहे बदलते भोपाळ शहर आणि त्याचे बसलेले दोन मोठे धक्के. भोपाळच्या वायू गळतीचे मृत्यू हा पहिला धक्का आहे. पुस्तकात कन्हैय्या कंसामध्ये लिहितो की मुन्नाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी एका प्रकाशित अहवालात मांडले आहे की भोपाळ मधील कोरोना पिडीत मृत्यूंपैकी 73 टक्के मृत्यू हे गॅस बाधितांचे होते. मुन्नाला प्रशासक म्हणून काम करताना आकडे लपवण्याचा खोटेपणा मनाला त्रास देत राहतो त्यामुळे लिहिता लिहिता तो मांडतो की जंतुनाशकाच्या कारखान्यात कधीही स्फोट होऊ शकतो हे राजीव कुमार केसवाणींनी 1982 च्या लेखात मांडले होते त्याकडे दुर्लक्ष झाले. मुन्नाला दुसरा मोठा धक्का आहे 2019 ची निवडणूक. नथुराम गोडसे चे समर्थन करणारे उमेदवार बहुमताने खासदार म्हणून भोपाळचे प्रतिनिधित्व करते. या नव्या भारताचा मुन्नाला त्रास होतोय तेव्हा त्याला गांधीजींचा आधार भेटलेला आहे. मुन्ना म्हणजे वीरेश प्रताप सिंग हा राजघराण्यात जन्मलेला असला तरी संवेदनाक्षम आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाचा आहे. आयडिया ऑफ इंडियाला भारताचा आत्मा मानणारा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहे. त्याने अत्यंत अस्वस्थ होऊन आवेगाने लिहिलेले असलं तरीही चिंतनशील नक्कीच आहे. या लिखाणाच्या आवेगात कधी कधी पुनरुक्ती आढळते. अगदी नजीकच्या इतिहासातील घटना मांडल्याने तपशील अधिक हवे , अधिक सखोल विश्लेषण हवे अशा अपेक्षा वाढत राहतात. इथे लेखकाने एका लेखकाची, त्याच्या विचाराची आणि त्याच्या संपादकाची आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे. मात्र गोष्टीला महत्त्व फार कमी दिलेले आहे. लिखाणाची रचना गोष्ट टाळून निखळ वैचारिक टीकात्मक करणे शक्य असतानाही, केलेली नाही. यातून लेखकाला मांडणीच्या मोकळेढाकळेपणाचे स्वातंत्र्य घेता येते आणि वैचारिक आणि तपशीलातील चर्चेला बगल देता येते.
या पुस्तकातील एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे. शेतकऱ्याप्रमाणे गांधींनी जगभर बिया फेकल्या. त्यातल्या काही आमच्या प्राथमिक शाळेत पडल्या. एकदा खैरून नावाच्या मुलीला आम्ही वर्गात चिडवलं. तेंव्हा शिक्षक आम्हाला म्हणाले ' कोणालाही चिडवणे वाईट आहे. खैरुनला चिडवणं जास्त वाईट. तिची आई वडील तिला घेऊन पाकिस्तानला निघाले होते. जाताना एका स्फोटात आई-वडील मारले गेले. तिचे काका पाकिस्तानला गेले नाही कारण त्यांची भारतावर श्रद्धा आहे. काका तिला इथे घेऊन आले आणि आपल्या शाळेत तिला घातलंय.' थोड्यावेळाने शिक्षकांनी आम्हाला बोलावून सांगितलं ' गांधीजींनी सांगितलेलं तुम्ही कधीच विसरू नका. तुम्ही चांगल्या हिंदू सारखे वागलात तर प्रत्येक मुसलमान तुमचा आदर करेल '. आपण गांधीवादी असा किंवा विरोधी , गांधी टाळून भारतात पुढचं पाऊल टाकता येत नाही. भारत बदलला आहे असं कुठेतरी वाटत असेल तर कृष्णकुमारांचे लिखाण आपल्याला नक्कीच स्पर्श करेल.
विजय तांबे
English translation of the original Marathi Text
Have you ever checked the information that comes on social
media every day? When was the last time you spoke after thinking carefully?
When was the last time you had a tolerant thought about a non-religious person?
When was the last time you felt compassion for the suffering of strangers or
groups? When was the last time you had a serious thought about the daily
suicides of farmers? What do children who fail in government competitive exams
do? What happens to the masses who are displaced in big projects? Have I ever
tried to find out? Am I a voter or a citizen? Is there any difference between a
voter and a citizen?
Nowadays, the answers to these questions, why should I seek
them? What is my connection? The vast majority of people are likely to think
like this. Today is not the time to ask questions. When questions arise, you
have to think. You have to worry about your head. From this, the amount of
qualities such as brotherhood, love, affection, tolerance, etc. starts
increasing in me. Instead, I happily immerse myself in the poisonous waves of
burning identities. I would achieve my salvation through my identity. I feel
safe in the group identity. It is no problem to accept that most of us feel so
safe, which is the reality of today.
Educationist Krishna Kumar is one of the many who clearly
realizes that there is a big difference between today's India and the India
that got independence. His book 'Thank You Gandhi' explores this awareness.
Without discussing whether this book is a novel or an ideological writing or a
fusion of them, what is important is why and what Krishna Kumar has to say.
Independence has just been achieved. There are two friends
in a village in Madhya Pradesh. The age is kindergarten. The first is Viresh
Pratap Singh from the royal family. The second is Kanhaiya, the son of a local
lawyer. Everyone calls Viresh Munna. Both are studying in a primary school
based on Gandhiji's Nai Talim concept. After that, things move rapidly. Munna
becomes an IAS. Gets married. Starts working in the Madhya Pradesh cadre. Then
Delhi. After retirement, he stays in Delhi. Kanhaiya is a professor in Delhi.
He writes a little. The friendship between the two remains. Munna gets infected
with Corona. He becomes serious. Before dying, he sends an email to Kanhaiya.
If I don't live, you complete my half-written work. The author has covered all
this in the first twenty-seven pages. The author does not want the reader to
get involved in this story.
Kanhaiya, numbed by Munna's death, reads his mail again and
again. There are ten files attached to that mail. One or two of them are in
Hindi and the rest are in English. The file names start with the letter
"G". That means it might be Government. Officers who have retired
from the civil service write biographies, most likely. Therefore, Kanhaiya is
skeptical about whether to do this work or not. Still, since he has the
responsibility after the death of his close friend, Kanhaiya keeps reading. The
author presents Kanhaiya's changing reaction while reading. After writing about
his initial slow life and noting the changing situation around him, Munna
writes that a new culture in the government has taken over India. When he
realizes that Munna is commenting on a politically cursed country, he realizes
this and Kanhaiya becomes cautious. When he realizes that there are explosives
hidden in this chaotic writing, he decides that he wants to make this writing
readable without making too many compromises. The title of the last tenth small
file is Thank You Gandhi. Then the whole writing makes sense to Kanhaiya and he
feels like 'My friend is telling me to get rid of my fear and intellectual
evasion. Should I be the editor who satisfies the publisher by giving him the
revised text he wants? Then what is the point of my being a writer? Munna is
not alive to tell what the consequences of telling the truth will be. However,
Gandhi is the symbol of salvation from this difficulty. I have decided to keep
Gandhi in my mind. Munna has started the work of interpreting Gandhiji's truth,
non-violence and other ways in my own way. By connecting the dots in it, I have
regained my lost ideological security.'
Almost two-thirds of the following text is written by Munna.
Life since childhood. Its values. Then the IAS career. Working in Madhya
Pradesh. Laying the foundation stone of Bharat Bhavan. The assassination of
Indira Gandhi. The riots in response to it. The gas leak of Union Carbide. The
changing Bhopal. Two important decisions in Rajiv Gandhi's reign.
Implementation of the Mandal Commission. The Babri Masjid case. The Shaheen
Bagh movement even before Corona. Discussing all these issues, he has tried to
clarify the picture of the changing India. Munna discusses Gandhiji. He also
discusses the writings of many people on Gandhi. While discussing where
Gandhi's idea of truth might have come from, how he might have considered
faith, while outlining how Gandhi's thought was formed through the
intermingling of concepts from various religious thought, he makes an important
statement: 'The practice of values cannot be individual. My value of freedom
has no meaning without making everyone independent.'
Gandhiji's love for Ram was well known. His last words were
also Ram. However, Gurudev Tagore has compared Gandhi's ability to pull the
people into the movement with Shri Krishna. Taking this point further, the
comparison of Gandhi and Krishna's end and the spinning wheel and the flute is
worth reading. Gandhiji's thoughts on truth, science, religion, caste system
have been re-examined and interpreted in a new perspective. The root cause of
Munna's book is the changing city of Bhopal and its two major shocks. The death
of Bhopal's gas leak is the first shock. In the book, Kanhaiya writes in Kansa
that two years after Munna's death, a report published stated that 73 percent
of the deaths of corona victims in Bhopal were gas victims. Munna is bothered
by the lie of hiding figures while working as an administrator, so while
writing, he states that Rajiv Kumar Keswani had mentioned in his 1982 article
that an explosion could happen at any time in a disinfectant factory, which was
ignored. Munna's second big setback is the 2019 elections. A candidate who
supports Nathuram Godse represents Bhopal as an MP with a majority. When Munna
is troubled by this new India, he has found the support of Gandhiji. Munna is
Viresh Pratap Singh, although born in a royal family, but he is a sensitive and
serious personality. He is a retired IAS officer who considers the Idea of
India to be the soul of India. Even though he wrote it in a very agitated
manner, he is certainly contemplative. Sometimes there is repetition in the impulse
of this writing. By presenting events in very recent history, expectations of
more details, more in-depth analysis keep increasing. Here, the author has told
us the story of a writer, his thoughts and his editor. However, the importance
of the story is given very little. Although it is possible to avoid the
structure of the writing and make it purely ideologically critical, it is not
done. This allows the author to take the freedom of openness of the arrangement
and to avoid ideological and detailed discussions.
One incident in this book is worth mentioning. Like a
farmer, Gandhi scattered seeds all over the world. Some of them fell in our
primary school. Once we teased a girl named Khairun in class. Then the teacher
told us 'It is bad to tease anyone. It is worse to tease Khairun. Her parents
had taken her to Pakistan. On the way, her parents were killed in a blast. Her
uncle did not go to Pakistan because he has faith in India. My uncle brought
her here and enrolled her in his school.' After a while, the teacher called us
and told us 'Never forget what Gandhiji said. If you behave like a good Hindu,
every Muslim will respect you'. Whether you are a Gandhian or an anti-Gandhi,
you cannot take a step forward in India by avoiding Gandhi. If you feel that
India has changed somewhere, Krishnakumar's writings will definitely touch you.
Vijay Tambe
Comments
Post a Comment