Visit of Actor Aamir Khan at Sevagram Ashram



Photos,News Clippings,Videos 



























 


आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट


विख्यात अभिनेता आमीर खान यांचा आजचा वर्धा दौरा अत्यंत गोपनीय स्वरूपात आटोपला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी दौऱ्याची सूचना दिली होती.

Written by लोकसत्ता टीम
वर्धा
June 23, 2024 21:12 IST



आमिर खान म्हणतोय, “गांधी विचारांचा माझ्यावर प्रभाव”; सेवाग्राम आश्रमाला भेट (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
वर्धा : विख्यात अभिनेता आमिर खान यांचा आजचा वर्धा दौरा अत्यंत गोपनीय स्वरूपात आटोपला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी दौऱ्याची सूचना दिली होती. मात्र, याबाबत कुणालाही कळवू नका, माध्यमांना दूर ठेवा, असे त्यांनी बजावले होते. तरीही त्यांची भेट गाजलीच. आमिर खान हे पाणी फाउंडेशनचे काम बघतात. सर्वत्र चालणाऱ्या या कामासाठी आता ‘फार्मर कप’ देण्यात येणार असून त्याचा आरंभ त्यांनी वर्धा जिल्ह्यातून केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आमिर खान यांचे ‘फार्मर कप’ स्पर्धा आयोजनात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या उपक्रमातून वर्धा जिल्हा एक मॉडेल म्हणून पुढे येईल, असा विश्वास आमिर खानने व्यक्त केला.

प्रारंभी आमिर खान यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे कर्डीले यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यावेळी सहपरिवार उपस्थित होते. यानंतर परत जाताना आमिर खान यांनी सेवाग्राम आश्रमास भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या या जगप्रसिद्ध आश्रमास भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. महात्माजींचे विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या ठिकाणी आल्यावर एक नवाच आनंद व मनःशांती मिळाली. महात्माजी यांच्या विचारांचा माझ्यावर विशेष प्रभाव राहिला आहे. आमिर खान यांनी आश्रमतील बापू कुटी, निवास व अन्य ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली. या वास्तू पाहून मन धन्य झाले. ज्या परिसरात महात्माजी अनेक वर्ष राहिले, त्या ठिकाणी भेट देऊन इतिहास समजून घेतला, याचा आनंद आहे. आज येथे भेट देऊन जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही, असे आमिर खान यांनी सांगितले


आमिर खान यांचे यावेळी आश्रम परिवारातर्फे सूतमाला, चरखा भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कर्डीले, पोलीस अधीक्षक हसन, पाणी फाउंडेशनचे डॉ. सचिन पावडे तसेच आश्रमचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या आकस्मिक भेटीचा कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून आयोजक संस्थांनी विशेष खबरदारी घेतली होती. पण तरीही शेतकरी संवाद व सेवाग्राम आश्रम भेट यामुळे आमिर खान या नावाची लोकप्रियता लोकांना दिसून आलीच.



Aamir Khan Visits Mahatma Gandhi's Ashram In Sevagram, Talks About Bapu's 'Great Influence' On Him


IANS
Updated on: 23 June 2024 11:16 pm

Bollywood's perfectionist Aamir Khan on Sunday visited Sevagram in Maharashtra for the first time, and said how he has been an ardent follower of Mahatma Gandhi while also underlining the Father of the Nation's influence on him.


Sevagram, located in Maharashtra, is the place of Mahatma Gandhi's ashram, and his residence from 1936 till his death in 1948. After Sabarmati, Sevagram Ashram holds immense importance as it was the residence of Mahatma Gandhi. Talking to mediapersons, Aamir, said: "I have come for the first time in Sevagram. There is a magical energy over here. I have been a follower of Bapuji, and his thoughts had a great influence on me. I am very happy that I have come to a place where he has spent time and days. The things he had used... seeing them felt great which I can't express in words. It's a really wonderful place."
....


Aamir Khan: 'महात्मा गांधींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव', सेवाग्राम आश्रमाला आमिर खानची भेट
साम टिव्ही ब्युरो
Updated:23rd Jun, 2024 at 11:45 PM
चेतन व्यास, साम टीव्ही, वर्धा प्रतिनिधी

जलसंधारणाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत वर्धा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या फार्मर कपमध्ये सहभागी शेतकरी व अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आमिर खान याने आज अचानक दौरा केला आहे. अभिनेता आमिर खान यांचा आजचा हा दौरा अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला होता.

अमीर खान वर्धेत दाखल होताच त्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ आयोजित कार्यक्रमात त्याने वर्धा जिल्ह्यातील फार्मर कपमध्ये सहभागी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यानंतर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात त्याने भेट दिली. आमिर खान सेवाग्राम आश्रमात पोहचताच पावसाला जोरदार सुरवात झाली.


सेवाग्राम येथील भेटीदरम्यान आमिर खान यानेआपल्या जीवनात महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव असून मी पहिल्यांदा सेवाग्रामला आलो आहे. येथे येऊन एक नवीन ऊर्जा मिळाली आहे, असं तो म्हणाला.

आमिर खान याने फार्मर कपमध्ये सहभागी शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी त्याने वर्धेकरांच्या सहभागबद्दल आनंद व्यक्त केला. वर्धा हे संपूर्ण राज्यात मॉडेल जिल्हा आहे. हा दौरा मला शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी होता. म्हणून गोपनीय ठेवण्यात आला, असं त्याने सांगितलं.




Aamir Khan Visits In SevaGram: आमिर खान ने सेवाग्राम में महात्मा गांधी के आश्रम का किया दौरा
Aamir Khan Visits Mahatma Gandhi Aashram In SevaGram: रविवार को पहली बार महाराष्ट्र के सेवाग्राम पहुंचे अभिनेता आमिर खान

मुंबई
Jun 23, 2024 / 10:05 pm

Saurabh Mall
Aamir Khan Visits Mahatma Gandhi Aashram In SevaGram
Aamir Khan Visits Mahatma Gandhi Aashram In SevaGram


Aamir Khan Visits In SevaGram: बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ने रविवार को पहली बार महाराष्ट्र के सेवाग्राम का दौरा किया। एक्टर ने बताया कि वह महात्मा गांधी के अनुयायी रहे हैं। साथ ही खान ने राष्ट्रपिता महात्मा गांधी के अपने ऊपर प्रभाव के बारे में बात की।
बता दें महाराष्ट्र में स्थित सेवाग्राम महात्मा गांधी का आश्रम है। 1936 से 1948 में अपनी मृत्यु तक वे यहीं रहे।
Aamir Khan Visits In SevaGram
Aamir Khan Visits In SevaGram
आमिर खान ने मीडियाकर्मियों से बात करते हुए क्या कुछ कहा यह भी जानें
आमिर खान ने मीडियाकर्मियों से बात करते हुए कहा, “मैं पहली बार सेवाग्राम आया हूं। यहां एक जादुई ऊर्जा है। मैं बापूजी का अनुयायी रहा हूं। उनके विचारों का मुझ पर बहुत प्रभाव है। मैं बहुत खुश हूं कि मैं उस जगह आया हूं, जहां उन्होंने समय बिताए हैं। उन्होंने जिन चीजों का इस्तेमाल किया था। उन्हें देखकर बहुत अच्छा लगा, जिसे मैं शब्दों में बयां नहीं कर सकता। यह वाकई एक अद्भुत जगह है।”
..

https://x.com/PTI_News/status/1804861852574228579?t=N3EM25aT5-ZMa0Q6GwYd7A&s=08

"I have come to Sevagram for the first time and on entering, I felt an amazing energy here. I am a follower of Bapuji (Mahatma Gandhi) and his thinking has had a profound impact on me. I am happy to come where he spent his time and to see the things he used. It’s really a wonderful place.” 

(Full video available on PTI Videos - ptivideos.com)











Reported By: Atul Singh, Written By: Snigdha Behera,
June 24, 2024 11:22 IST
Aamir Khan visited Sevagram Ashram in the Wardha district of Maharashtra for the first time. The Laal Singh Chadha actor also spoke about how he has been an ardent follower of Mahatma Gandhi and has also been a great influence on him. Let's delve into the details of what else he spoke about. 

After the program of the Paani Foundation, Aamir Khan visited Bapu Kuti and the ashram area. On this occasion, actor Aamir Khan was welcomed by the Ashram Pratishthan by giving him a cotton garland and a spinning wheel which was presented to Aamir Khan. The actor also said, "I have come to the ashram for the first time and I am happy to be here." 

He further said, "As soon as I entered here, I felt a different energy. I am a great follower of Gandhiji. Bapu's thoughts have had a great influence on me. I am very happy that where Bapuji stayed for a long time. Today I got a chance to go there..Seeing the things he used, how much difference it made. I cannot describe it in words."

..






पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात पोहचला अभिनेता आमीर खान, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 5:02 PM

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे.


पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात पोहचला अभिनेता आमीर खान, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानने आपल्या 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. नुकतेच 'पानी फाउंडेशन'च्या कामानिमित्त आमिर खान वर्धा येथे पोहचला. यावेळी त्याने सेवाग्राम आश्रमालाही भेट दिली. 

 वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात रविवारी आमिर खान पोहचला. अभिनेत्याने सुरुवातीला शहरातील पाणी फाउंडेशनचा कार्यक्रमाला हजेरी लावली. वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय येथे पानी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने पानी फाउंडेशनचा संस्थापक आमिर खान वर्ध्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करतांना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर चर्चा आणि माहिती देण्यात आली.  हा कार्यक्रम संपल्यानंतर आमिर खान हा आश्रमात पोहचला. 




आमिर खानला आश्रमाकडून कातलेल्या सुताची माळ आणि चरखा भेट स्वरुपात देण्यात आला. माध्यमांशी बोलताना आमिर खान म्हणाला,  प्रथमच महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात आलो आहे. इथे आल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. इथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली.  गांधीजींच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव राहिला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ज्या ठिकाणी  बापूजी दीर्घकाळ राहिले, ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या, त्या पाहून वेगळीच अनुभूती आली, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही', असं तो म्हणाला. 

आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पानी फाउंडेशनची टीम मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि आसपास जल संरक्षण गतिविधिच्या कार्याशी सलग्न आहे. फाउंडेशनच्या अविश्वसनीय कार्याने, वेळ आणि प्रयत्नाने मनुष्य, वृक्ष आणि पशुपक्ष्यांना सामंजस्यपूर्ण रुपात  सक्षम बनवले असून त्यांच्या प्रयत्नाने पडीक, दुष्काळी जमिनीवर आज हरित जंगले उभी राहताना दिसत आहेत. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आता तो या सिनेमात काम करत आहे. 'तारे जमीन पर' मधला ईशान म्हणजेच दर्शिल सफारीही पुन्हा आमिरसोबत दिसणार आहे. 



टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीबॉलिवूडमहात्मा गांधी



Comments

Popular posts from this blog

Positive Power Dynamics

Allowance for the upkeep of Gandhi as a State Prisoner in 1930

Mahatma Gandhi: Kaalavum Karmaparvavum 1869-1915 New book in Malayalam