Gandhi Bhajans of Rashtra Sant Tukdoji Maharaj Marathi
या प्रीय
भारताचा जीवप्राण बापु गेला ( गांधी गीतांजली )
(चाल : या प्रीय भारताचा का वीट...)
या प्रीय भारताचा जीवप्राण बापु
गेला ।
झाली महान हानी भरवे न ही कुणाला ।।धृ0।।
चरखा धरोनि हाती तत्वार्थ सूत काती ।
त्यानेच पार तोडी परदास्य -
शृंखलेला ।।१।।
शेतात राबणाऱ्या मजुरासमान
रही ।
अन्याय हा जराही सहवे न त्या
जिवाला ।।२।।
सेवा करावयाची जमनता -
जमार्दनांची ।
ही नित्य बाणि ज्याची आदेश दे जनाला
।।३।।
हे जाति - पंथ सारे अति झूट स्पष्ट
सांगे ।
परधर्म हेहि सारे असती समान
ज्याला ।।४।।
अपल्याच कीर्तिने जो झाला जगी महात्मा ।
अन्यायवृत्तिने पण त्यावरहि कहर
केला ।।५।।
तुकड्या म्हणे युगाचा, मानव्यता जगाचा ।
हे राम ! राम ! ! म्हणता रामीच लीन झाला
।।६।।
मोहन गेला सोडुनी ( गांधी गीतांजली )
(चाल-रघुवर
तुमको मेरी लाज...)
मोहन गेला
सोडुनी ।
अति झाली जगाची हानी ।।धृ0।।
देउनिया नवटृष्टि भारता ।
दावुनि मानवतेच्या पंथा ।।
स्वतंत्र करून देश आमुचा,
केले सगळ्या
गुणी ।।१।।
सत्याकरिता केली तपस्या ।
सोडूनि सर्व प्रलोभन-आशा ।।
विश्वासुनिया देवावरती,
लिन झाला
प्रार्थनी ।।२।।
अमर कीर्तिंचा दिवा उजळला ।
रुढिप्रिय अंधार निरसला ।।
तृकड्यादास म्हणे सत्याचा,
मंत्र जगा दावुनी ।।३।।
भारतभूच्या प्रीय महात्म्या ! ( गांधी
गीतांजली )
(चाल: कृष्ण कृष्ण मैं पुकारु...)
भारतभूच्या प्रीय महात्म्या !
तव यश
विजयी राहू दे ।।
स्वतंत्र झालेल्या देशाला, पुढे पुढे सरसावू दे ।।धृ0।।
क्षमा करी अपराध आमुचा, जो तुझ्याप्रति जाहला ।
वर्ष - वर्ष ना मिटे, जो डाग हृदया लागला ।
अज्ञ म्हणुनी सोड, पश्चाताप मानसि पावू दे ।।१।।
पूर्ण करण्या भावना तव, शक्ति सगळ्यांना असो ।
रामराज्यचि हो पुन्हा, ऐसी जनी भक्ती दिसो ।
पक्षांधता मतभिन्नतेचा द्वेष विलया जाऊ
दे ।।२।।
कीर्ति व्यापू दे तुझ्या दुरदृष्टिची
या भूवरी ।
सत्यतेची-शांततेची रंगु दे जग
- वैखरी ।
दास तुकड्या मागतो, मज नित्य तव गुण गाऊ दे ।।३।।
पूज्य गांधिची सद्गुणस्फूर्ती
नसानसातुनि स्फुरे
(चाल - पटा तटाला फोडुनि...)
पूज्य गांधिची सद्गुणस्फूर्ती
नसानसातुनि स्फुरे
भारता मोह न हा आवरे ॥धृ०॥
जिकडे - तिकडे रामराज्य हो ध्वनि हा
गगनीं फिरे
घरोघरि वेडचि याचे भरे ।
जो तो अपुल्या शक्तियुक्तिने कार्य
कराया झुरे
आमुचा देश गौरवे स्मरे ।
घराघरातुनि वीर शिपायी धावताति बावरे
घ्यावया आज्ञा देती शिरे ।
ही प्रचंड शक्ती कोठुनिया उमलली ?
ही अवघड कोडी कशी कुणा समजली ?
ही मानवतेची युक्ति कशी उमगली ?
निःसंशय हे सिध्द जाहले तेज यशाचे भरे
भारता मोह न हा 0 ॥१॥
प्राण पणी लावता चेतले भारत चहुबाजुनी
न मानी काहि कुणाला कुणी I
जो तो सत्ताधीश मीच हे म्हणुनी शासन करी
बुद्धिला ठावच ना दे उरी I
जिवलग भारत देशाचा हा सोडुनि गेला वरी
जाहली जनता अति बावरी ।
या करु या बापूचे स्वप्न पुरे बोलती ।
संकल्प शेकडो झाले त्यांच्या प्रति ।
गजबजला भारत - देश गुंगली मती ।
त्यांचिच ही परिणती भासते जिवंतपणा मनि
भरे
भारता मोह न हा 0॥२॥
कधी न टळते वचन महात्मे बोलतात जे मुखे
फळाया येइ सुखे वा दुखे ।
जिवंतपणि त्या दोन हात परि मृत्यूने
सारिखे
वाढती असंख्य बाहू मुखे ।
अमर तयांची वाणी वाणी जीवमात्र सारिखे
न कोणी बंद करुनिया रुके ।
सरकार असो वा प्रजा सर्व आपुले ।
हे समजुनि ज्याने पाय पुढे घेतले ।
नच सत्य - अहिंसे कधी कुठे सोडले ।
समान हक्कासाठिच त्याची कीर्ति दिंगती
उरे
भारता मोह न हा 0 ॥३॥
समाज - शिक्षण समान -जिवन प्राप्त
व्हावया जना
शेकडो कर्यांच्या योजना ।
काय - काय होईल भारती कळे न अजुनी कुणा
रंग हा वाढतसे नित दुणा ।
जाति - पंथ - संप्रदाय सारे विसरुनी
ह्या भावना
सांगती म्हणा भारतिय म्हणा I
ही स्फूर्तिज्योति प्रगटली अता भारतीं ।
झळकला प्रगटला प्रकाश हा भोवती ।
सरकार - प्रजेची एकच व्हाया युती ।
तुकड्यादास म्हणे जनता ही जनपद - कार्या
फिरे
भारता मोह न हा0॥४॥
राष्ट्रपित्याची अमर भावना पूर्ण कराया
चला
( चाल : हटातटाने पटा रंगवूनि ... )
राष्ट्रपित्याची अमर भावना पूर्ण कराया चला I
चला रे ! सगळे मिळुनी चला ॥धृ0॥
देश जाहता स्वतंत्र आता देशासाठी तुम्ही
तुम्हात्मा नाहि कशाची कमी ।
हे अपुले ते दुसरे म्हणूनी जिभा विटाळू
नका
पहा राव नी रंक सारिखा ।
वीर शिपायी बना लडा जारि संकट आले कुणी
देश हा होऊ न ह्यावा ऋणी ।
( अंतरा ) ही प्रचंड शक्ती युक्ती घ्या पाठीशीं ।
सत्यास नम्र व्हा परि न नमा शुत्रुसी ।
येउ द्या मरण जरि आले या भूमिशी ।
सावधान व्हा करा तयारी सोडुनिया गलबला
चलारे सगळे मिळुनी चला ॥१॥
पहा - पहा हे चारि बाजुनी ऐकुं येते कसे
जीव हा उडू - उडू बघतसे ।
द्वेष कुणाशी नाश कुणाचा चोर कुणाच्या
घरी ?
वाहवा ! न्याय घरीच्या घरी !!
ऐकायला कर्ण नको अणि नेत्र बघाया नको
जीव हा वैभव घ्यावा नको ।
( अंतरा ) ही जबाबदारी आली तरूणांवरी ।
भारता रक्षिण्या व्हा सगळे सामुरी ।
अन्याय करु नका पाहू नका यापरी ।
तुकड्यादास म्हणे यासाठिच देह प्रभूने
दिला
चला रे ! सगळे मिळुनी चला ॥२ ॥
Comments
Post a Comment