200 years of Indian Opinion
“प्रेसला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. ती सत्ता नक्कीच आहे. परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग म्हणजे गुन्हेगारी करणे आहे. मी स्वत: एक पत्रकार आहे आणि पत्रकारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे आणि सत्याचे समर्थन करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम न करता पुढे जाण्याचे आवाहन करतो”.
-- मो. क. गांधी "हरिजन", 27 एप्रिल 1947
गांधीजींच्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ ज्या "Indian Opinion" ने झाली त्याला आज ४ जून २०२३ ला बरोबर १२० वर्षे पूर्ण झाली!
"Indian Opinion" हे इ.स. १९०३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले महत्वाचे साप्ताहिक होते. याचा पहिला अंक ४ जून १९०३ ला प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी वाचकांच्या हातात पडला. याचे पहिले संपादक मनसुखलाल नाजर होते. इंटरनॅशनल प्रिंटिंग प्रेस येथे हे साप्ताहिक छापले जात असे. नंतर १९०४ मध्ये त्याचे फिनिक्स सेटलमेंट मध्ये स्थलांतर करण्यात आले. Indian Opinion ने नेताल इंडियन काँग्रेस चे प्रमुख प्रचार साधन म्हणून काम केले. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या ब्रिटिश भारतीयांसाठी Indian Opinion गुजराथी, इंग्रजी, तमिळ आणि हिंदी अशा चार भाषेत प्रकाशित होऊ लागले. मनसुखलाल नाझर हे पहिले संपादक झाले. परंतु इंडियन ओपिनियन चे बहुतांश संपादकीय काम गांधीजी स्वतःच सांभाळत.
पहिल्या अंकात अग्रलेखासह leading article, 'The British Indians in South Africa', आणि पाच छोटे स्फुट, 'Is It Fair?', 'Virtuous Inconsistency', 'Better Late Than Never', 'Words And Deeds', and 'Minutes By The Mayor', गांधीजींनी लिहिले होते.
पुढे हेबर्ट किचिन, हेन्री पोलक, अल्बर्ट वेस्ट, मणिलाल गांधी आणि त्यांच्या मृत्यूनंतर मणिलाल यांच्या पत्नी सुशीला गांधी यांनी संपादक म्हणून काम पाहिले. मणिलाल सर्वात जास्त काळ म्हणजे ३६ वर्षे संपादक होते.
१९०३ मध्ये सुरू झालेले *इंडियन ओपिनियन* १९६१ पर्यंत प्रसिद्ध होत होते.
Comments
Post a Comment