In the News
Wardha News: महात्मा गांधींचा वारसा जपणारं सेवाग्राम, पाहा कसं बनवतात कापसापासून कापड, Video
महात्मा गांधी यांनी चरख्यापासून सूत कातत स्वदेशीचा पुरस्कार केला. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात आजही महात्मा गांधींचा वारसा जपत आहेत.
महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू केली. चरख्यावर सूत कातून खादी कापड तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. त्या काळात कापसाची वेचणी करून कापसाची स्वच्छ्ता करणे आणि मग कापड तयार करणे यामध्ये भारतीय कारागीर कुशल होते. 1917 - 18 साली साबरमती आश्रम येथे प्रथम कापडाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर चरख्यावर सूत कातणे हा ही चळवळीचा भाग बनला.
Comments
Post a Comment