30 एप्रिल 1936 सेगाव येथे आश्रमाची स्थापना

 

30 एप्रिल 1936
सेगाव येथे आश्रमाची स्थापना




३० एप्रिल २०२३
सेवाग्राम आश्रमाचा ८७ वा स्थापना दिन


डॉ. सिबी के. जोसेफ,

संचालक,श्री जमनालाल बजाज मेमोरियल वाचनालय आणि रिसर्च सेंटर फॉर गांधीयन स्टडीज, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान,  वर्धा-442102, महाराष्ट्र

 

 


भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यावरच आश्रमात परत येईन, अशी प्रतिज्ञा घेऊन गांधीजींनी अहमदाबाद येथील सत्याग्रह आश्रम १२ मार्च १९३० रोजी सोडला आणि ते दांडी यात्रेसाठी निघाले

 


येरवडा तुरूंगातून सुटल्या वर २३ सप्टेंबर १९३३ रोजी गांधीजी वर्धा येथे आले. जमनालाल बजाज यांच्या बजाजवाडीतील निवास स्थानी ते वास्तव्याला होते. त्या नंतर ही जागा स्वातंत्र्य लढ्यातील कामगार आणि नेत्यांसाठी राष्ट्रीय अतिथी गृह बनले. पुढे ७ नोव्हेंबर १९३३ ला येथूनच त्यांनी आपल्या हरिजन यात्रेला सुरुवात केली.




७ ऑगस्ट १९३४ ला गांधीजी पुन्हा वर्ध्यात परतले आणि येथील विनोबा भावे यांच्या सत्याग्रह आश्रमात मुक्काम केला. तो आता महिला आश्रम म्हणून ओळखला जातो. याच काळात गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर २९ ऑक्टोबर १९३४ ला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.




                 सत्याग्रह आश्रमात जमनालाल बजाज    आणि महात्मा गांधी    १९३४

गांधीजींना वर्ध्यात स्थायिक होण्यासाठी राजी करण्याचे श्रेय महात्मा गांधींचे पाचवे पुत्र मानले जाणारे जमनालाल बजाज यांना जाते.




गांधीजींनी आपली सर्व शक्ती गावांच्या उन्नतीसाठी खर्च करण्याचे ठरविले. १५ डिसेंबर १९३४ रोजी वर्धा येथे अखिल भारतीय ग्रामोद्योग संघटनेची स्थापना झाली.  जमनालाल बजाज यांनी गांधीजींना वीस एकर जमीन आणि एक घर दान केले होते. नंतर ते घर अखिल भारतीय ग्रामोद्योग संघटनेचे मुख्यालय बनले. पुढे त्याला मगनलाल गांधींच्या स्मरणार्थ मगनवाडी असे नाव देण्यात आले. 




                                 अखिल भारतीय ग्रामोद्योग संघटनेची बैठक.१६ मार्च १९३५



                                            ऑगस्ट १९३५ 
मगनवाडी 




                                 मगनवाडी येथे परमहंसांच्या
सोबत भोजन - ऑगस्ट १९३५

 

माझ्या वर्ध्यात राहण्याबद्दल


१९ मार्च १९३६ ला जमनालाल बजाज यांना दिल्लीहून लिहिलेल्या पत्रातून

 

कस्तूरबा ची इच्छा असल्यास त्यांच्यासह नाही तर मी एकटाच सेगावच्या झोपडीत राहीन.

मीराबेन ची कुटी मला पुरेशी नाही.

नवी कुटी कमीत कमी खर्चात व्हावी पण कुठल्याही परिस्थितीत तो खर्च १०० रुपयांच्या वर जात कामा नये.

मला लागणारी सर्व प्रकारची मदत मी सेगाव मधूनच घेईन. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मी मगनवाडीला येत राहीन. त्यावेळी मिळेल ते वाहन वापरेन.

मीरे ने माझ्यासाठी वेळ खर्च करायची गरज नाही पण खेड्यातील कामात ती मला मदत करू शकेल.

महादेव, कांती आणि इतर खेड्यात राहू शकतील. त्यांच्यासाठी साधी कुटी उभी करता येईल.

माझी बाहेरची कामे येथील कामासोबत सुरु राहतील.

काही विशेष महत्वाचे काम असल्याखेरीज बाहेरच्या लोकांनी मला भेटायला सेगावला येऊ नये. ठरलेल्या दिवशी जेव्हा मी मगनवाडीला असतो तेव्हा ते मला भेटू शकतात.

 बापू

१७ एप्रिल १९३६ नंतर सेगावच्या लोकांसमोर केलेले भाषण

तुमच्या सोबत असलेली मीराबेन इथे तुमच्या भल्या साठी स्थायिक होण्याच्या इराद्याने आली होती. पण ती आपला हेतू पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही, असे मला वाटते. जरी ती कायम राहिली तरी आपल्या मनाला  मुरड घातल्या शिवाय ती हे करू शकणार नाही. काही वेळा असे होते कि आपली इच्छा खूप काही करायची असते पण शरीर साथ देत नाही. मी आणि मीरा एकाच धेय्याच्या अतूट नात्याने एकत्र बांधले गेलो आहोत. त्यामुळे तिला जे करता आले नाही ते करणे  माझे कर्तव्य आहे. म्हणून देवाची इच्छा असेल तर मी तुमच्यात राहायला येईन आणि त्यासाठी तिला दिली नाही ती शक्ती कदाचित देव मला देईल.   परंतु देव अनेक प्रकारे आपली इच्छा व्यक्त करत असतो. तुमची सद्भावना माझ्यासोबत नसेल तर मी देखील माझ्या ध्येयात अपयशी ठरेन. लहानपणापासून मी एक गोष्ट ठरवली आहे. जे लोक माझ्याकडे अविश्वासाने, संशयाने किंवा भीतीने पाहतात त्यांनी मला स्वीकारावे असा आग्रह मी धरत नाही. माझ्या येथे येण्यामागे तुमची सेवा करण्याशिवाय इतर कुठलाही उद्देश नाही. काही ठिकाणी मी आणि माझ्या कार्यक्रमांकडे लोकं काहीशा भीती युक्त नजरेने पाहतात. मी अस्पृशता निवारणाचे जे ध्येय स्वीकारले आहे ते या भीतीचे कारण आहे. माझ्यामधून मी अस्पृश्यता पूर्णपणे काढून टाकली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, राजपूत, महार, चांभार या सर्वांना मी समान मानतो आणि जन्मावर आधारित असलेले हे भेद अनैतिक आहेत असे मी मानतो. मीराबेन ने बहुदा तुम्हाला हे सांगितले असावे. उच्च नीचतेच्या भेदभावाने आपले आयुष्य कलुषित करून टाकले आहे. परंतु माझे हे विचार मी तुमच्यावर लादणार नाही. मात्र मी तुम्हाला समजावून सांगून आणि त्याही पेक्षा जास्त माझ्या वागण्यामधून तुमच्या मनातली भेदाभेदाची भावना दूर करण्याचा प्रयत्न करेन.

 रस्ते आणि परिसर साफ करणे, कोणी आजारी असेल तर त्याची सेवा आणि शक्य ती मदत करणे, गावातील हस्तकला, ग्रामोद्योग आदींचे पुनर्जीवन करून तुम्हाला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी सेवा करण्याचा मी  नम्र प्रयत्न करेन. यात तुम्ही मला मदत केली तर मला आनंद होईल. आणि जर मदत नाही करू शकलात तर  मी समाधानाने तुमच्यातील एक होऊन राहीन.

मी येथेच राहण्यासाठी आलो आहे. परमेश्वराची इच्छा असल्यास ते शक्य होईल. माझे भारतातून दक्षिण आफ्रिकेत जाणे, तेथून साबरमतीला आणि साबरमतीहून मगनवाडी  आणि आता मगनवाडीहून  सेगावला हे सगळे त्याच्याच इच्छेनुसार झालेले आहे.




                         २४ एप्रिल १९३६ नागपूर येथील अखिल भारतीय साहित्य परिषदेत

 

अखिल भारतीय साहित्य परिषद, नागपूर येथील महात्मा गांधींचे भाषण (२४ एप्रिल १९३६)

मी तुमच्याशी थोडं बोलायला आलो आहे. पण बघा माझे मन ना इथे आहे ना वर्ध्याला. ते थेट वर्ध्या जवळच्या खेड्यात गुंतून पडले आहे. या खेड्यात येण्यासाठी मी काही दिवस सरदारशी झगडलो आहे. त्यांना हे पटनाही. पण परमेश्वराची इच्छा असल्यास मात्र मी लवकरच वर्ध्या जवळील खेड्यात स्थाईक होणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझे सध्या करतो आहे ते काम सोडले आहे आणि मित्रांशी चर्चा करायला किंवा कोणाला सल्ला हवा असेल तर तो द्यायला मी उपलब्ध नसेन. फक्त माझा पत्ता, मी साधे आयुष्य जगात असलेल्या खेड्याचा असेल इतकेच. खेड्यात  काम करणाऱ्या माझ्या सहकार्यांनीही खेड्यात राहूनच सेवा केली पाहिजे. स्वतः खेड्यात जाऊन राहिल्याशिवाय  माझ्या कामाचा योग्य परिणाम होणार नाही असे मला वाटते.


 

सेगाव

महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाचे  पाहिले काम सिंदी नावाच्या लहान खेड्यात सुरु झाले. पण त्यांना हवे असलेले खेडे त्यांची शिष्या मेडेलीन स्लेडने (मीराबेन) निवडून दिले. हे खेडे वर्ध्यापासून चार मैल तर भारताच्या मधोमध असलेल्या नागपूर पासून ४६ मैल अंतरावर होते.

मीराबेनला पत्र

वर्धा,२९ एप्रिल १९३६

चि. मीरा

परमेश्वराची इच्छा असल्यास मी उद्या येईन. कागदपत्रे पाठवीत आहे.

बाकी प्रत्यक्ष भेटी अंती.

सकाळी ७.०० वाजता आपण भेटू.

सस्नेह,

बापू




              मगनवाडी,वर्धा ते सेगावआपल्या सहकाऱ्या सोबत पायी जाताना (३० एप्रिल १९३६)

 

३० एप्रिल ला सेगावला पाय रोवले !

 

३० एप्रिल १९३६ ला महात्माजींनी सेगावला आपले घर मानले. त्यांची झोपडी अजून तयार व्हायची होती म्हणून ते येथेच एका पेरूच्या झाडाखाली राहिले. त्यांच्या या पहिल्या भेटीत ते इथे दोन तीन दिवसच राहिले. एव्हाना वय ६७ वर्षाचे झाले होते. खेड्यापासून दूर एखादा आश्रम काढावा असे त्यांच्या मनात नव्हते. संपूर्ण खेडं म्हणजेच आश्रम असायला हवं असं त्यांना वाटायला लागलं होत. खेड्यात एकटेच राहावे आणि तिची इच्छा असल्यास कस्तूरबा ने सुद्धा यावे असे त्यांना वाटे. मात्र जसजसा काळ जाऊ लागला तसा आश्रम रूपाला  येऊ लागला.


सेगावला कार्यकर्त्यां सोबत चर्चा: ३० एप्रिल १९३६

 

बापू, तुम्हाला वाटत नाही का," एका कार्यकर्त्याने विचारले, " की या गावात स्वत:ला गाडून घेण्या ऐवजी, ग्रामीण पुनर्बांधणी कार्यक्रमासाठी तुम्ही देशभर दौरा करावा? तुमच्या हरिजन दौर्याने लोकांच्या मनात मूक क्रांती कशी घडवून आणली हे काय मी वेगळे सांगायला हवे? ते दुसर्‍या कशानेही साध्य झाले नसते. तुम्ही तसा दौरा पुन्हा का करत नाही?

गांधीजी: अरे नाही, हरीजनांचे आणि ग्राम विकासाचे काम या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. हरिजन कार्यात व्यावहारिक आणि सैद्धांतिक पैलूंची सांगड घातली गेली. इथे मी दोघांची सांगड घालू शकत नाही. सध्या तर मी गावाच्या कामाच्या माझ्या कल्पना सांगत आहे. येथील वास्तविक अडचणींना मी अजून सामोरे गेलेलो नाही. इथे राहून येथील समस्यांना तोंड दिल्या शिवाय मला इथले प्रश्न समजणार नाहीत.” उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतु गावात आणि लोकांमधे घालवल्यावर मिळालेल्या, आजवर मला नसलेल्या, अनुभवातून मी काही शिकू शकेन.  गजानन नाईक काय काम करतो ते बघायला मी काल शिंदी गावात गेलो होतो. तिथली परीस्थिती यथातथाच  होती, तरीही तो मन लाऊन उत्साहात काम करत होता. ते पाहून मनात आले की मी गजानन सोबत काम करत असतो तर त्याच्या अडचणी मी समजू शकलो असतो.” आणि मग मला प्रकर्षाने जाणवले की माझी खेडे हेच माझ्यासाठी योग्य ठिकाण आहे.

प्रभावतींना पत्र

३० एप्रिल १९३६

…. मी आज सेगावला आलोय आणि येथे किमान तीन दिवस राहीन. त्यानंतर एक दोन दिवसांनी, ८ तारखेला बंगलोर ला रवाना होईन.

माझ्या सोबत एकटा प्यारेलाल आहे. तब्येत ठिक नसल्यामुळे बा येऊ शकल्या नाही.

बापूंचे आशिर्वाद

इस्थर मेननला पत्र

(३० एप्रिल १९३६ किंवा त्यानंतर)

हे पत्र मी सेगाव येथून लिहित आहे. मी येथे स्थायिक होण्यासाठी आलो आहे. इथे मीराबेन आधी पासूनच आहे. मी येथे स्थाईक झाल्यास ती जवळपासच्या दुसर्‍या खेड्यात जाईल. शक्य झाल्यास मी माझ्या जुन्या सहकाऱ्या शिवाय स्वतंत्रपणेकाम करायचा प्रयत्न करेन.

-बापू

अमृत कौर ला पत्र

१ मे १९३६

अखेरीस मी सेगावला पोहोचलो. सोबत प्यारेलाल आहे. मला त्याची गरज आहे.

बा येणार होती पण तिच्या आजारपणामुळे येऊ शकली नाही. मी हे सर्व अंतर पायी चाललो. आम्ही जरा रस्ता चुकल्यामुळे माझ्या सोबत्यांना काळजी वाटू लागली म्हणून शेवटचे पाऊण मैल बंडी ने आलो. अशा रीतीने काल येथे पोहोचलो.

कालची रात्र छान गेली.

सेगावात गांधीजींचे पाहिले पाहुणे डॉ बाबासाहेब आंबेडकर!

गांधीजींनी सेगावला स्थाईक व्हायचे ठरवल्या नंतर दुसर्‍याच दिवशी, १ मे १९३६ ला, डॉ. बी आर. आंबेडकर त्यांना भेटायला सेगावला आले. सहा महिन्यांपूर्वी डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणार असे जाहीर केले होते. आंबेडकर नुकतेच अमृतसरहून बैठक संपवून आले होते. शीख धर्म आपल्या सर्व अनुयायांना समानतेची वागणूक देतो म्हणून त्यांनी शीख धर्म स्वीकारण्याचे सुतोवाच केले होते. गांधी आणि आंबेडकरांनी धर्मांतराच्या प्रश्नावर चर्चा केली. परंतु चर्चेच्या निष्कर्षावर दोघेही समाधानी नव्हते आणि पुन्हा यावर चर्चेसाठी भेटायचे ठरले.

वल्लभभाई पटेलांना पत्र

सेगाव,

१ मे १९३६

बंधू वल्लभभाई,

..... इथली हवा छान आहे. रात्री चांगलाच गारवा होता. माझ्या जेवणखाण्याची सोय झाली आहे. फुरसत मिळेत तेव्हा याबद्दल सविस्तर बोलेन.

डॉक्टर (आंबेडकर) आणि वालचंद येथे सेगावला भेटले. ते पुन्हा येणार आहेत.

आशिर्वाद,

-- बापू

अमृत कौर ला पत्र

सेगाव,

४ मे १९३६

महादेव इथे आहे आणि तुमचे पत्र त्याने आणले आहे त्यामुळे हे पत्र मला त्याच्या कडूनच पाठवणे क्रमप्राप्त आहे. मगनवाडीला डाक साधारणपणे सायंकाळी पोहोचते. त्यामुळे त्याच दिवशी ती पाहणे आणि उत्तर देणे शक्य होत नाही. तुमची डाक सेगावला रात्री उशिराने येते, हे ही तसेच आहे. तात्पर्य, इथे पत्रे पोहोचण्यास उशीर होत नाही.

.....मी येथे मजेत आहे, काळजी नसावी.

अमृत कौरला पत्र, सेगाव, ५ मे १९३६

एव्हाना तुला सेगावहून नक्कीच अनेक पत्रे आली असतील. एक दोन दिवसातच ही जागा आणि इथलं आयुष्य तुला आवडायला लागले असेल याची मला खात्री आहे. काळ माझ्या सोबत बा आल्या.  सगळे अंतर पायी गेलो. दोन तास लागले! आणि आम्ही पुन्हा रस्ता चुकलो. आम्ही नवखे होतो, कोणी वाटाड्या नव्हता. चालताना मी गप्प होतो. सगळे अंतर मी पावणे दोन तासात आरामात पार करू शकतो. मी थकलो नव्हतो म्हणून संध्याकाळच्या फिरण्यासाठी तयार होतो. संध्याकाळी ८.३० ला महादेव आणि लीलावती आले आणि काम चालू होते तिथेच जमिनीवर झोपले. आम्ही सगळे तिथेच झोपत असू. आजूबाजूला खोदलेले खड्डे आणि त्यातील मातीचे करून ठेवलेले ढिगारे असत! येथेच पेरलेल्या भाज्या आम्ही खात असू! त्यात विविधता नव्हती, पण स्थानिक भाज्या खातो हे समाधान मोठे होते. पण यामुळे दुसर्‍या भाज्या पेराव्या असे वाटायला लागले. सेगाव बद्दल एवढे पुरे.  मला ८ तारखेला सकाळी निघायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

प्रमुख कार्यक्रम

वर्ध्याला अखिल भारतीय ग्रामोद्योग समितीच्या प्रदर्शनात भाषण ३ मे १९३६

पवनार खादी यात्रेत भाषण  ६ मे १९३६

वर्ध्याला अखिल भारतीय ग्रामोद्योग समितीच्या सभेत भाषण  ७ मे १९३६


 

                                वर्धा ते (सेगाव) सेवाग्राम टांग्याचा प्रवास  - मे १९३६



                             सेगाव १९३६, आपल्या झोपडी समोर




                                             १९३६, मीराबेन सोबत




                                  सेगाव येथे ग्राम सेवेसाठी तयार, १९३६


हा माझा पागलखाना आहे’-  गांधीजी

सेवाग्रामच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल

 अमृत कौर: आश्रमातील पागल लोकांच्या व्यक्तिगत भानगडींवर तुम्ही इतका वेळ का वाया घालवता?

गांधीजी: हा पागलखाना आहे आणि मी यातला सगळ्यात मोठा वेडा आहे हे मला माहित आहे. पण या वेड्यान्मधला चांगुलपणा ज्यांना दिसत नाही ते मात्र आंधळे आहेत हे नक्की!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Sarva Seva Sangh, Varanasi

Cycle Yatra against the Culture of Greed

Sarva Seva Sangh Varanasi